-
Makar Sankranti 2026: कलर्स मराठी वाहिनीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा-Reunion’ (Pinga Ga Pori Pinga Reunion) या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री विदिशा म्हसकर (Vidisha Mhaskar) ‘तेजा’ची भूमिका साकारत असून, नुकताच मालिकेत मकर संक्रांतीचा विशेष भाग पार पडला.
-
नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
-
या निमित्ताने विदिशाने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या चंद्रकोर साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या लूकला विदिशाने पारंपरिक हलव्याच्या दागिन्यांची जोड दिली आहे.
-
विदिशाच्या या मराठमोळ्या सौंदर्यावर चाहत्यांकडून सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना विदिशाने कॅप्शन दिले आहे. “तिळगुळ घ्या आणि तेजासारखं स्पष्टच बोला… तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा!”
-
(सर्व फोटो सौजन्य : विदिशा म्हसकर/इन्स्टाग्राम)
Akshay Kumar : मुंबईत बेदरकार मर्सिडीजमुळे अक्षय कुमारच्या गाडीला अपघात, इनोव्हा थेट दोन चाकांवरच उभी राहिली; रिक्षाचा चक्काचूर