-
गोविंदा व सुनीता आहुजा बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. दोघे अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.
-
अनेकदा या दोघांच्या घटस्फोटाच्या तर गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा सुरू असतात. अशातच आता सुनीता यांनी थेट उल्लेख न करता गोविंदा डेट करत असलेल्या मुलीचं नाव सांगितल्याचं म्हटलं जातयं.
-
‘मिस मालिनी’शी संवाद साधताना याबद्दल सुनीता म्हणाल्या, “२०२५ हे वर्ष माझ्यासाठी फार वाईट होतं. मी व माझं कुटुंब आम्ही कठीण काळातून गेलो. गोविंदाबद्दलच्या काही गोष्टी माझ्या कानावर येत होत्या आणि त्या मला अजिबात आवडत नव्हत्या. प्रत्येक गोष्टीसाठी एक वय असतं आणि वयाच्या ६३ व्या वर्षी मुलं मोठी झालेली असताना असं काहीतरी करणं योग्य नाही.”
-
पतीबद्दल सुनीता पुढे म्हणाल्या, “२०२६ मध्ये मी आशा करते की, देव गोविंदाला सदबुद्धी देईल. त्याला कळायला हवं की, कुटुंब हे कुटुंब असतं. ज्यावेळी तुम्ही वाईट परिस्थितीतून जात असता तेव्हा कोणीही तुमच्यामागे उभं राहत नाही. लोकांना फक्त तुमच्याकडे असलेल्या पैशांशी देणं-घेणं आहे. ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे संपतील तेव्हा तेही निघून जातील.”
-
सुनीता पुढे म्हणाल्या, “लग्नात आपल्या जोडीदारावर विश्वास असणं फार महत्त्वाचं असतं. एकदा तुम्ही विश्वास गमावला की, मग लग्न फार काळ टिकत नाही. आजकाल तर घटस्फोट फारच सामान्य घटना झाली आहे. माझ्या मते ते चांगलं नाही.”
-
सुनीता म्हणाल्या, “हल्ली गोष्टी फार बदलल्या आहेत. लोकांचा एकमेकांवर विश्वास नाहीये. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी अनेक जण मेडिकल टेस्टही करतात.”
-
उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना, सुनीता यांनी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला, “तुझं नाव कोमल आहे का? या नावात थोडी गडबड आहे. मला हे नाव अजिबात आवडत नाही. हे नाव बदल. कोमल नावाची मुलगी मला अजिबात आवडत नाही,” असं म्हटलं.
-
त्यामुळे सुनीता यांनी उल्लेख न करता गोविंदा डेट करत असलेल्या मुलीचं नाव सांगितलं असल्याची चर्चा आहे.
-
सुनीता यांनी एका मुलाखतीत त्या व गोविंदा एका घरात राहत नसून वेगवेगळे राहतात असंही म्हटलेलं. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
बुध, गुरू आणि शुक्राचा ‘षडाष्टक योग’ करोडपती बनवणार, ‘या’ तीन राशी पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार