-
मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले (Girija Oak Godbole) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या गिरीजाच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
‘नॅशनल क्रश’ची नवी अदा २०२५ मधील एका मुलाखतीदरम्यान गिरीजाचा निळ्या साडीतील लूक तुफान व्हायरल झाला होता.
-
नेटकऱ्यांनी गिरीजाला सोशल मीडियावरील ‘नॅशनल क्रश’ म्हणून पसंती दिली होती.
-
आता गिरीजाने ‘हाऊस ऑफ आद्या’ या ब्रँडसाठी केलेल्या खास फोटोशूटचे केले आहे.
-
गिरीजाने नेसलेली पेस्टल रंगाची साडी आणि त्यावरील तिचे सौंदर्य पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
-
अभिनय प्रवास आणि कौटुंबिक पार्श्वभूमी वयाच्या १५ व्या वर्षी अभिनयात पदार्पण करणाऱ्या गिरीजाने नाटक, चित्रपट, मालिका आणि जाहिरात अशा सर्वच माध्यमांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
गिरीजा ही प्रसिद्ध मराठी अभिनेते डॉ. गिरीश ओक (Actor Girish Oak) यांची कन्या आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा ओक-गोडबोले/इन्स्टाग्राम)
Donald Trump: मुंबई शेअर बाजारात तेजी; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दावोसमधील ‘त्या’ विधानामुळे गुंतवणूकदारांची भीती दूर