-
‘छावा’ सिनेमाबद्दल आणि बॉलीवूडमध्ये सांप्रदायिक घटकांमुळे मिळणाऱ्या कामावर प्रभाव पडत असल्याच्या वक्तव्यामुळे ए. आर. रहमान सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
-
त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रहमान चर्चेत आले आहेत.
-
मात्र, तुम्हाला माहितीय का रहमान हे आधी हिंदू होते. नंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. ए. एस. दिलीप कुमार हे नाव बदलून, ते अल्ला रक्खा रहमान (ए. आर. रहमान) झाले.
-
२०१५ साली नसीर मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या ‘ए. आर. रहमान : द स्पिरिट ऑफ म्युझिक’ या पुस्तकात रहमान यांनी स्वतःचा आध्यात्मिक प्रवास सांगितला आहे.
-
रहमान सांगतात, “माझी आई हिंदू होती आणि ती नियमित पूजा-पाठ करायची. ती आध्यात्मिक विचारांची होती. आम्ही हबीबुल्लाह रोडवर राहत असलेल्या घराच्या भिंतींवर हिंदू देवतांची चित्रं होती.”
-
वडिलांना कॅन्सर झाला होता आणि शेवटच्या दिवसांत एका सूफी संतानं त्यांच्यावर उपचार केले होते. त्या सूफी संताच्या संपर्कात आल्यानंतर संपूर्ण कुटुंबानं इस्लाम धर्म स्वीकारला.
-
धर्मांतराबाबत रहमान म्हणालेले, “सूफी मार्गावर कुणालाही जबरदस्तीनं आणलं जात नाही. जेव्हा तुम्हाला मनापासून वाटतं, तेव्हाच तो मार्ग स्वीकारला जातो.”
-
ए. आर. रहमान यांच्या नावाबाबतही एक खास गोष्ट. लहान बहिणीची कुंडली दाखवण्यासाठी ते ज्योतिषाकडे गेले असता त्यांनी ज्योतिषाला याबाबत विचारलं. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
-
रहमान यांना त्या ज्योतिषानं ‘अब्दुल रहमान’ व ‘अब्दुल रहीम’ ही दोन नावं सुचवली होती. यापैकी त्यांना ‘रहमान’ हे नाव आवडलं. त्यामुळे त्यांनी तेच नाव ठेवलं.
BP Medicine Timing: बीपीच्या गोळ्या कधी घ्यायच्या? डॉक्टरांनी सांगितलेली ‘ही’ योग्य वेळ माहीत आहे का? जाणून घ्या…