-
‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात यंदा सोशल मीडियावर ‘फोकस्ड इंडियन’ म्हणून लोकप्रिय असलेल्या इन्फ्ल्यूएन्सर करण सोनावणेची एन्ट्री झाली आहे.
-
सोशल मीडियावर विनोदी रीलद्वारे प्रेक्षकांना हसवणाऱ्या करणनं प्रत्यक्ष आयुष्यात मात्र संघर्ष केला आहे. याबद्दल त्यानं काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात खुलासा केला.
-
‘बिग बॉस’च्या घरात करण म्हणालेला, “घरी लोक पैसे मागायला यायचे, तेव्हा पप्पा लपायचे; पण मला तेव्हा ते कळायचं नाही. याचा मला ट्रॉमा आहे.”
-
यापुढे तो म्हणालेला, “मला माझ्या मुलाला आयुष्यात जे हवंय, ते सगळं मिळायला पाहिजे. असं म्हणतात की, पैशानं आनंद विकत घेता येत नाही; पण मला असं वाटत नाही. तुम्ही पैशांनी आनंद विकत घेऊ शकता.”
-
तसंच त्यानं म्हटलेलं, “मी आई-वडिलांना दुबईला घेऊन गेलो होतो. तिथे ‘बुर्ज खलिफा’च्या येथे घेऊन गेलो. तिथे त्यांच्यासाठी एक खोली घेतली. तिथे मी त्यांना एक सरप्राईजही दिलं ते म्हणजे स्काय डायव्हिंगचं…”
-
स्काय डायव्हिंगचा अनुभव शेअर करीत करण म्हणालेला, “स्काय डायव्हिंगपेक्षा अजून मोठा अनुभव काय असू शकतो. ४० वर्षं बँकेत काम केलेला माणूस आणि आई यांच्यासाठी तो अनुभव खूपच छान होता.”
-
पुढे तो म्हणाला, “तुम्ही पैशांनी आनंद विकत घेऊ शकता. माझ्या आई-बाबांचंसुद्धा तेच म्हणणं आहे. पैशानं आनंद विकत घेता येतो, तुम्हाला तो विकत घेता आला पाहिजे.”
-
करण हा लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आहे. करणच्या अनेक रील चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्याचे अनेक व्हिडीओला मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत.
-
करणनं भारताचे क्रिकेट सामने आणि IPL मधील मुंबई इंडियन्स संघातील क्रिकेटपटूंसह रील केल्या आहेत. तसेच त्यानं अनेक बॉलीवूड अभिनेत्यांबरोबरही काही मजेशीर व्हिडीओ केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
“१०० कॅमेरे असताना तुम्ही…”, अनुश्री मानेबद्दल स्पष्टच बोलला धनंजय पोवार; म्हणाला, “आता रितेश सरांनी…”