-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून (Aai Kuthe Kay Karte TV Serial) घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राधा सागर (Radha Sagar) सध्या चर्चेत आहे.
-
राधाने नुकतेच आपल्या कुटुंबासह खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी (Jejuri) गडावर हजेरी लावली.
-
राधाचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
राधाने नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
नुकत्याच केलेल्या जेजुरी दौऱ्याचे फोटो शेअर करताना राधाने ‘कृतज्ञ… येळकोट येळकोट जय मल्हार’ असे कॅप्शन दिले आहे.
-
यावेळी राधाने परिधान केलेल्या जांभळ्या रंगाच्या साडीतील सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
-
भंडाऱ्याची उधळण आणि भक्तीचा उत्साह जेजुरी गड हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचे देवस्थान आहे.
-
भंडाऱ्याची उधळण हे या गडाचे मुख्य वैशिष्ट्य. भंडारामुळे संपूर्ण गड सोन्यासारखा पिवळाधमक दिसतो, म्हणूनच याला ‘सोन्याची जेजुरी’ असेही म्हटले जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : राधा सागर/इन्स्टाग्राम)
थायलंडमध्ये स्वप्नवत नोकरी मिळाली म्हणून आनंदात होता, तिथं गेल्यानंतर करावं लागलं ‘डर्टी वर्क’