-
‘नॅशनल क्रश’ फेम मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोलेच्या (Girija Oak Godbole) नव्या फोटोंची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये गिरीजाने काळ्या रंगाचा प्लेन सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
गिरीजाने हे फोटोशूट सायली मराठेच्या ‘हाऊस ऑफ आद्या’ या ब्रॅण्डसाठी केले आहे.
-
झोपाळ्यावर बसून दिलेल्या गिरीजाच्या खास पोजनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.
-
गिरीजा केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही, तर सहज आणि वास्तववादी अभिनयासाठीही ओळखली जाते.
-
गिरीजाने अभिनयाच्या जोरावर मोठ्या पडद्यासह वेब सीरिजच्या विश्वातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
-
झी मराठीवरील ‘लज्जा’ मालिकेतील गिरीजाची ‘मनस्वी’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा ओक-गोडबोले/इन्स्टाग्राम)
झोपल्यानंतर तुमच्याही तोंडातून लाळ गळते का? मग दुर्लक्ष करू नका; कारणे आणि उपाय समजून घ्या