-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऊर्मिला कोठारे हिने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये ऊर्मिलाने पांढऱ्या रंगाची अत्यंत सुंदर साडी परिधान केली असून, त्यावर तिरंग्याचे केशरी आणि हिरवे रंग उठून दिसत आहेत.
-
ऊर्मिलाने तिच्या या लूकला ‘Wrapped in grace, woven with pride’ अशी कॅप्शन देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
‘Celebrating the colors of our nation and the beauty of our roots’ असे लिहीत तिने भारतीय संस्कृतीबद्दलचा आपला आदर दर्शवला आहे.
-
या साध्या, पण तितक्याच प्रभावी पेहरावात ऊर्मिलाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून, चाहत्यांनी तिच्या या लूकला पसंतीची पावती दिली आहे.
-
चाहत्यांना शुभेच्छा देताना ऊर्मिलाने पोस्टच्या शेवटी ‘Happy Republic Day’ आणि ‘प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा’ असे लिहिले आहे.
-
निसर्गरम्य पार्श्वभूमीवर काढलेल्या या फोटोमध्ये तिने आपल्या पारंपरिक दागिन्यांनी लूक पूर्ण केला असून, तिची ही स्टाईल विशेष चर्चेत आहे.
-
सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत असून, ऊर्मिलाच्या फोटोंचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऊर्मिला कोठारे/इन्स्टाग्राम)
झोपल्यानंतर तुमच्याही तोंडातून लाळ गळते का? मग दुर्लक्ष करू नका; कारणे आणि उपाय समजून घ्या