-
झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’फेम अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने अक्षय घरतसोबत १७ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली.
-
या खास फोटोमध्ये दिव्या आणि अक्षय समुद्रकिनारी एकमेकांसोबत निवांत क्षण घालवताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
दिव्याने शेअर केलेल्या या रोमँटिक फोटोमध्ये तिची आणि अक्षयची जबरदस्त केमिस्ट्री असल्याचे स्पष्ट होत आहे.
-
फोटोमध्ये दिव्या कॅज्युअल लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसते आहे. अक्षयसोबतची तिची ही ‘पाऊट’ पोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
दिव्याने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी ‘क्यूट कपल’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
‘मुलगी झाली हो’ मालिकेतून साजिरी म्हणून दिव्या घराघरात पोहोचली.
-
साजिरी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या दिव्याने आता ‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीच्या भूमिकेतूनही लोकप्रियता मिळवली आहे.
-
कामाच्या व्यापातून वेळ काढून समुद्रकिनारी घालवलेले हे क्षण दिव्यासाठी किती खास आहेत, हे तिच्या या गोड फोटोवरून सिद्ध होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: दिव्या पुगावकर/इन्स्टाग्राम)
Kim Jong Un North Korea Election : उत्तर कोरियात किम जोंग उन यांचा ९९.९३% मतांनी विजय; पण विरोधात मतदान करणाऱ्या ‘त्या’ ०.०७% लोकांचं काय झालं?