-
‘फ्रेशर्स’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ खिरीड नुकताच लग्नबंधनात अडकला. २३ जानेवारी रोजी त्याने गर्लफ्रेंड मैथिलीसह विवाहगाठ बांधली.
-
काही महिन्यांपूर्वीच सिद्धार्थनं सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. इतकंच नाही, तर त्यानं गर्लफ्रेंडला गोव्याच्या समुद्रकिनारी फिल्मी स्टाईलनं प्रपोज केलं होतं.
-
काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची चर्चा सुरू होती. सिद्धार्थ-मैथिलीच्या प्री-वेडिंग फोटोशूट, मेहंदी आणि हळदी सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.
-
अशातच आता सिद्धार्थने लग्नसोहळ्यातील आणखी खास फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याने लग्नात गुलाबी रंगाचा कुर्ता आणि त्यावर धोतर घातलं आहे. तर पत्नी मैथिलीनं नऊवारी साडी परिधान केली आहे.
-
सिद्धार्थनं गर्लफ्रेंड मैथिली भोसेकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे. मैथिली भोसेकर ही डेंटिस्ट आहे. तसेच तिला मॉडेलिंगचीही आवड आहे. अनेक स्पर्धांमध्ये तिनं सहभाग घेतला होता.
-
‘पॅरिस फॅशन वीक’मध्येही मैथिली झळकली आहे. तिनं मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२३ हा किताबही पटकावला आहे. दोन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात.
-
दरम्यान, लग्न लागताच सिद्धार्थ व मैथिली यांनी एकमेकांना नमस्कार केला. त्यांची ही कृती अनेकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या लग्नात अनेक मराठी कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती.
-
सिद्धार्थने शेअर केलेल्या त्याच्या लग्नाच्या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्स करीत प्रतिसाद देत आहेत. अनेक मराठी कलाकारांनीसुध्दा फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
सिद्धार्थ ‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये झळकलेला आहे. ‘मुरांबा’ मालिकेतही तो पाहायला मिळाला. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
