-
लोकप्रिय विनोदवीर भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे.
-
१९ डिसेंबर २०२५ रोजी भारतीने दुसऱ्यांदा मातृत्वाचा आनंद घेतला.
-
नुकताच या जोडीच्या धाकट्या लेकाचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून, त्याचे नाव आता समोर आले आहे.
-
भारती आणि हर्षने आपल्या लाडक्या मुलाचे नाव ‘यशवीर’ (Yashveer) असे ठेवले आहे.
-
या खास सोहळ्याचे काही खास क्षण सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
भारतीने या सोहळ्यासाठी गडद लाल रंगाचा सुंदर पंजाबी ड्रेस परिधान केला होता.
-
या सोहळ्यात हर्ष, मोठा मुलगा लक्ष्य आणि छोटा यशवीर यांनी जांभळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये ट्विनिंग केले होते.
-
भारती आणि हर्षला ‘लक्ष्य’ (Laksh Singh Limbachiya) नावाचा मोठा मुलगा असून त्याचा जन्म ३ एप्रिल २०२२ रोजी झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : भारती सिंग/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
