-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओकचा (Prasad Oak) मोठा मुलगा सार्थकचा (Sarthak Oak) साखरपुडा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
सार्थकची होणारी पत्नी रितू (Dr. Ritu) व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आहे.
-
या खास सोहळ्यात सार्थकापेक्षा त्याच्या आईच्या, म्हणजेच मंजिरी ओक (Manjiri Oak) यांच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
-
मंजिरी यांनी या सोहळ्यासाठी फिकट निळ्या रंगाची अत्यंत सुंदर अशी डिझायनर साडी परिधान नेसली होती.
-
या साडीला साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईलमुळे त्यांचं सौंदर्य खुलले होते.
-
सार्थकने त्याचे उच्च शिक्षण जर्मनीत पूर्ण केले असून दोन वर्षांपूर्वी त्याच्या पदवीदान समारंभासाठी ओक कुटुंब जर्मनीला गेले होते.
-
या साखरपुड्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंजिरी ओक/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
