-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले.
-
अजित पवार मुंबईहून बारामतीला जाताना धावपट्टीजवळ विमान कोसळलं.
-
या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला.
-
यानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.
-
अजित पवारांच्या निधनानंतर नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार पाटेकर याने काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो नाना पाटेकर यांच्या फार्महाऊसचे आहेत.
-
एका फोटोत नाना पाटेकर, अजित पवार, निलकांती पाटेकर व मल्हार पाटेकर दिसत आहेत.
-
“अजितदादा पवार यांच्या निधनाने आमचे वैयक्तिक नुकसान झाले आहे. ते आमच्यासाठी कुटुंबासारखे होते आणि आयुष्यभर राहतील. त्यांच्याबरोबरच्या अविस्मरणीय आठवणी.. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे,” असे कॅप्शन देत मल्हार पाटेकरने फेसबुकवर पोस्ट केली आहे.
-
(फोटो सौजन्य- मल्हार पाटेकर फेसबूक व अजित पवार इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
