-
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा (Rani Mukerji) बहुप्रतिक्षित ‘मर्दानी ३’ (Mardaani 3 Movie) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.
-
मुलींचे बेपत्ता होणे आणि मानवी तस्करी यांसारख्या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात एका मराठमोळ्या बालकलाकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
ती म्हणजे गोड गळ्याची आणि तितक्याच प्रभावी अभिनयाची देणगी लाभलेली बालकलाकार अवनी जोशी (Avanee Joshi).
-
यशराज फिल्म्सची निर्मिती आणि अभिराज मिनावाला यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात राणी मुखर्जीबरोबर मल्लिका प्रसाद आणि जानकी बोडीवाला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
या दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत अवनी जोशी एका महत्त्वपूर्ण आणि मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.
-
कडक ऑडिशनचे अनेक टप्पे यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर अवनीची या भूमिकेसाठी निवड झाली.
-
अवनीला अभिनयाबरोबरच संगीताचाही वारसा लाभला आहे.
-
अवनी सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी आणि गायिका रसिका जोशी यांची कन्या आहे.
-
‘मर्दानी ३’ पूर्वी अवनीने अनेक मराठी मालिका आणि रिॲलिटी शो गाजवले आहेत.
-
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जारण’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते.
-
“यशराज फिल्म्ससारख्या मोठ्या बॅनरबरोबर आणि राणी मुखर्जींसारख्या दिग्गज अभिनेत्रीबरोबर काम करण्याचा अनुभव खूप काही शिकवून जाणारा होता,” अशा भावना अवनीने या निमित्ताने व्यक्त केल्या.
-
ट्रेलरला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता, अवनीची ही बॉलिवूड झेप तिच्या करिअरला नवी दिशा देणारी ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अवनी जोशी/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
