-
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानेटकर (Urmila Kanetkar) आपल्या अभिनयाबरोबरच नृत्याविष्कारानेही चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
-
नुकतेच उर्मिलाने निसर्गाच्या सानिध्यात, म्हणजेच शेतात मनमोहक फोटोशूट केले असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
या फोटोशूटसाठी उर्मिलाने पांढऱ्या रंगाचा चिकनकारी ड्रेस (Chikankari Dress Look) परिधान केला आहे.
-
हिरव्यागार शेताच्या पार्श्वभूमीवर उर्मिलाचा हा सिंपल लूक अत्यंत खुलून दिसत आहे.
-
उर्मिलाच्या मोहक सौंदर्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून, अनेकांनी तिला ‘खूप सुंदर’ आणि ‘नॅचरल ब्युटी’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
अभिनयाबरोबरच एक उत्तम शास्त्रीय नृत्यांगना असलेली उर्मिला नेहमीच आपल्या साध्या पण प्रभावी फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
-
याआधी उर्मिलाने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा असलेला पदर आणि पांढरी साडी नेसून केलेले फोटोशूटही चर्चेत राहिले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्मिला कानेटकर/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
