-
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झाले.
-
त्यांच्या जाण्याने राजकीयच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.
-
या दुःखद वातावरणात मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
आयुष्य, माणूसपण, काम आणि मानसिक थकवा यांवर प्रश्न उपस्थित करणारे विचार तिच्या पोस्टमधून समोर आले आहेत.
-
या भावनिक पोस्टमध्ये तिने लिहिले आहे, “कशाचा माज करावा माणसानं? सोबतच्या माणसांचा, केलेल्या कामाचा की कमावलेल्या पैशांचा? सगळे इथेच राहणार हे माहीत असूनही कसली धडपड सुरू आहे? कितीही मिळवलं तरी ते कमी पडणारच… मग नेमकं काय कमवायचं? काय मिळवायचं? नुसतं प्रश्न… उत्तर – परमात्म्यानं तुम्हाला बेस्ट काम करायला इथे पाठवलं आहे, ते झाल्याशिवाय सुटका नाही… नाना (माझे वडील) पण आता त्या कोणत्याही कामासाठी, माणसांसाठी कसलाही अट्टहास करावासा वाटत नाही इतकं नैराश्य आलं आहे.. कालपासून जीव अगदी दमून गेलाय.”
-
#कामाचा_माणूस म्हणजे परत स्वार्थी झालो का आपण? की माणसाला फक्त माणूसच समजायला हवं होतं? असो …, अशी खंतही या पोस्टमधून व्यक्त झाली आहे.
-
#कामाचा_माणूस आणि #दादा_अनंतात_विलीन_झाले, असे हॅशटॅग वापरत तिने आपली भावना शब्दांतून मोकळी केली आहे.
-
अश्विनी प्रदीपकुमार महांगडेच्या या पोस्टने अनेक चाहत्यांच्या मनातले प्रश्न मांडले असून, तिच्या प्रामाणिक भावनांवर सोशल मीडियावर मोठ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
