-
प्रियदर्शिनी इंदलकर ही आजच्या घडीला मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्वांत लाघवी आणि अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या प्रियदर्शिनीने आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रियदर्शिनीने नुकताच एक खास फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
-
“Thank you for all the love!!” असे म्हणत तिने मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
-
केवळ विनोदी भूमिकाच नव्हे, तर गंभीर आणि वैविध्यपूर्ण पात्रांमध्येही प्रियदर्शिनीने आपली छाप पाडली असून, आता ती एका मोठ्या प्रोजेक्टसह सज्ज झाली आहे.
-
तिचा चित्रपट ‘गांधी टॉक्स’ (Gandhi Talks) सध्या चर्चेत आहे.
-
हातात क्लॅपबोर्ड धरलेला एक फोटो शेअर करीत तिने प्रेक्षकांना ‘गांधी टॉक्स’ हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले आहे.
-
‘दशावतार’सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखविणारी प्रियदर्शिनी आता या मूक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
