-
आपल्या बहारदार लावणी नृत्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
गौतमी जितकी तिच्या डान्ससाठी ओळखली जाते, तितकीच तिच्या मराठमोळ्या लूकचीही चर्चा असते.
-
नुकतेच गौतमीने गुलाबी साडीतील काही खास फोटो शेअर केले असून, तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.
-
एका कार्यक्रमासाठी गौतमीने फिकट गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान केली होती.
-
या लूकची सर्वात आकर्षक गोष्ट ठरली ती म्हणजे गौतमीची ठसठशीत नथ.
-
गौतमीला साड्यांची विशेष आवड आहेच, पण तिच्या नाकातील मोठी मोत्याची नथ तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालते.
-
गौतमीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौतमी पाटील/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
