-
मराठी चित्रपटसृष्टीचा ‘स्टाईल आयकॉन’ अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.
-
या खास निमित्ताने त्याची ‘देवखेळ’मधील (Devkhel Series) सहकलाकार प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांची मुख्य भूमिका असलेली ‘देवखेळ’ ही वेब सीरिज ३० जानेवारी रोजी झी ५वर प्रदर्शित झाली.
-
या सीरिजच्या निमित्ताने अंकुशने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले आहे.
-
“पाप करणाऱ्यांचा हिशोब होणार!” अशी लक्षवेधी टॅगलाईन असलेल्या या मालिकेत प्राजक्ताने ‘सारिका निमकर’ तर अंकुशने ‘विश्वास सरंजामे’ ही भूमिका साकारली आहे.
-
आज ३१ जानेवारी रोजी अंकुशचा वाढदिवस तर आहेच, शिवाय त्याचा आणि अभिनेत्री दीपा परब-चौधरी यांच्या लग्नाचा १८ वा वाढदिवस देखील आहे.
-
दीपाने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
“लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात, म्हणूनच त्या वरच्याने मांडलेला १८ वर्षांचा हा सुंदर ‘देवखेळ’ सदैव असाच बहरत राहू देत. वाढदिवसाच्या आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!” असे कॅप्शन दीपाने दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
