-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
-
नुकतेच रेश्माने पारंपरिक साडीत केलेले हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या फोटोशूटसाठी रेश्माने हिरव्या रंगाची मुनिया पैठणी परिधान केली असून, त्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
या लूकला साजेसा असा मोजकाच दागिन्यांचा साज रेश्माने केला आहे.
-
केसांची सुंदर वेणी बांधून त्यावर माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याने रेश्माच्या या मराठमोळ्या लूकला पूर्णत्व दिले आहे.
-
हे फोटो शेअर करताना रेश्माने ‘साधेपणातच खरे सौंदर्य’ असे कॅप्शन दिले आहे.
-
रेश्मा सध्या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये (Gharoghari Matichya Chuli) ‘जानकी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
या भूमिकेमुळे रेश्मा सध्या घराघरात पोहोचली असून तिच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
