-
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अवनी म्हणजेच लाडकी अभिनेत्री साक्षी गांधी हिने नुकतेच ओडिशा येथील जगन्नाथ पुरी मंदिराला भेट दिली आहे.
-
साक्षीने या खास ट्रिपचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, निळ्या अथांग समुद्राच्या पार्श्वभूमीवर ती एका बोटीत बसली असल्याचे दिसत आहे.
-
या फोटोंना तिने ‘कागज़ के दो पंख लेके, उड़ा चला जाये रे, जहाँ नहीं जाना था ये, वहीँ चला हाय रे’ अशी अतिशय अर्थपूर्ण आणि गोड कॅप्शन दिली आहे.
-
साक्षीचा या फोटोंमधील लूक अत्यंत सात्त्विक आणि मोहक असून, तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.
-
पिवळ्या साडीवर तिने लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला असून, या मराठमोळ्या लूकला तिने अतिशय छान पद्धतीने कॅरी केले आहे.
-
तिच्या दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, गळ्यात ऑक्सिडाइज्ड हार आणि कानात मोठे झुमके, असा तिचा अस्सल पारंपरिक साज पाहायला मिळतोय.
-
हातामध्ये साधी बांगडी, अंगठी व कपाळावर छोटी टिकली लावून, साक्षीने आपला लूक अतिशय नैसर्गिक आणि प्रभावी ठेवला आहे.
-
समुद्राच्या हवेमुळे उडणारे केस व चेहऱ्यावरचे हास्य साक्षीच्या या फोटोंना अधिक जिवंत आणि प्रसन्न बनवत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
