-
माधुरी दीक्षित ही बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने ‘अबोध’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. १९८४ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अभिनेत्रीला १९८८ ला प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
-
तेजाबमधून लोकप्रियता मिळाल्यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिले नाही. तिने एकापेक्षा एक भूमिका आणि चित्रपट यातून बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. माधुरीच्या अभिनयाचा नाही तर तिच्या नृत्याचादेखील चाहतावर्ग निर्माण झाल्या. तिच्या अनेक भूमिका गाजल्या.
-
वर्दी, राम लखन, परिंदा, प्रेम प्रतिज्ञा, जमाई राजा, मुजरिम, त्रिदेव, किशन कन्हैय्या, जीवन का संघर्ष, मृत्यूदंड, राजा,कोयला, देवदास, हम तुम्हारे हैं सनम, लज्जा, हम आपके हैं कौन, कलंक असे माधुरीचे अनेक चित्रपट गाजले.
-
माधुरी दीक्षित तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत येत असली, तरी ती कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चांचा भाग बनली आहे. माधुरीने यशाच्या शिखरावर असताना लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर ती पतीसह अमेरिकेत स्थायिक झाली. काही काळ ती चित्रपटांपासून दूर होती. मात्र, अभिनेत्री आता पुन्हा एकदा चित्रपटात काम करत आहे. ती पतीसह भारतात परतली आहे.
-
विविध मुलाखतींमधून ती तिच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातील अनेक किस्से सांगते. तिचा पती, मुले यांच्याबद्दलही माधुरी मनमोकळेपणाने बोलत असते. आज आपण माधुरीच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊ…
-
माधुरीचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला. तिने मुंबईमधील अंधेरीतील डिवाइन चाइल्ड हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधून माध्यमिक शिक्षण घेतले. त्यामुळे तिने विले पार्लेमधील साठे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे अकरा-बारावीचे शिक्षण घेतले.
-
तिला मायक्रोबायोलॉजिस्ट बनायचे होते. त्यासाठी तिने बी.एस.सी.ला अॅडमिशन घेतले.
-
तिथे मायक्रोबायोलॉजी हा विषय निवडला. मात्र, सहा महिन्यानंत माधुरीने तिचे शिक्षण अर्धवट सोडले आणि अभिनयात पूर्णवेळ करिअर करण्याचा निर्णय घेतला. असे तिने तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये सांगितले होते. याबरोबरच, माधुरीने कथक डान्सर म्हणून ट्रेनिंग केले आहे.
-
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माधुरीने मिसेस देशपांडे या वेब सीरिजमधून ओटीटीमधून पदार्पण केले. (सर्व फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
