-
‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनचा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
-
विशालने नुकतेच अभिनेत्री अक्षया हिंदळकरबरोबर (Akshaya Hindalkar) रोमँटिक फोटोशूट केले असून, त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
या फोटोशूटमध्ये अक्षयाने स्टायलिश प्रिंटेड कॉटन वन पीस ड्रेस परिधान केला आहे, तर विशाल पांढऱ्या शर्ट आणि पॅंटमध्ये अतिशय डॅशिंग दिसत आहे.
-
दोघांची केमिस्ट्री या फोटोंमध्ये दिसत असून चाहत्यांनी त्यावर पसंतीची पावती दिली आहे.
-
सोशल मीडियावर चाहते ‘फेव्हरेट जोडी’ आणि ‘खूप छान जोडी’ अशा कमेंट्स करत या दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
-
विशाल आणि अक्षयाने स्टार प्रवाहवरील ‘साता जल्माच्या गाठी’ (Saata Jalmachya Gathi TV Serial) या मालिकेत एकत्र काम केले होते.
-
याच मालिकेच्या सेटवर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याचे बोलले जात आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून विशाल आणि अक्षया लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
-
मात्र, अद्याप दोघांनीही अधिकृतपणे यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य : विशाल निकम/इन्स्टाग्राम) हेही पाहा : ‘जरा जरा हे मन खुळावते…’; नम्रता संभेरावचं प्रिंटेड कॉटन साडीत खास फोटोशूट
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
