-
मराठी अभिनेत्री रूपाली भोसले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने नुकताच शेअर केलेला हा फोटो चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
या फोटोमध्ये रूपालीने हातमागाची लाल रंगाची सुंदर पैठणी परिधान केली आहे.
-
साडीसोबत तिने घातलेले पारंपरिक दागिने, गळ्यातील नेकलेस आणि बांगड्या तिच्या एकूणच लूकला उठाव देताना दिसतात.
-
या फोटोला रूपालीने ‘Beautiful Handloom Paithani‘ अशी कॅप्शन दिली आहे.
-
रूपाली भोसले सध्या लपंडाव या लोकप्रिय मराठी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असलेली रूपाली आपल्या पोस्ट्समधून अनेकदा मराठमोळ्या परंपरेचे दर्शन घडवत असते.
-
या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी तिच्या लूकसोबतच तिच्या अभिनय प्रवासाचेही कौतुक केले आहे.
-
रूपाली भोसलेने आतापर्यंत विविध भूमिका साकारत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. लपंडाव या मालिकेमुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रूपाली भोसले/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
