-
अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा आई होणार असून, तिच्या या दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या बातमीने सोशल मीडियावर आनंदाचे वातावरण आहे.
-
वयाची चाळिशी गाठलेली असताना सोनम कपूर दुसऱ्यांदा मातृत्वाचा अनुभव घेणार असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये सोनमने तिचा बेबी बंप अतिशय आत्मविश्वासाने आणि स्टायलिश पद्धतीने फ्लॉन्ट केला आहे.
-
या खास फोटोशूटसाठी सोनमने गडद निळ्या रंगाचा (Midnight Blue) मखमली म्हणजेच वेल्वेटचा ड्रेस परिधान केला आहे.
-
हा ड्रेस ‘ऑफ-शोल्डर’ स्वरूपाचा असून, त्यात सोनमचा लूक अत्यंत रॉयल आणि मोहक दिसत आहे.
-
सोनमने तिच्या हाताच्या बोटात एक मोठी आणि आकर्षक निळ्या रंगाच्या खड्याची अंगठी घातली आहे, जी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत. केसांचा लूक साधा, पण अत्यंत प्रभावी ठेवला आहे, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
-
फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी सोनम याही वेळी आपल्या मॅटर्निटी फॅशनने चाहत्यांना भुरळ घालत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनम कपूर/इन्स्टाग्राम)
Sunetra Pawar Oath : सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर, पुन्हा शपथ घ्यावी लागणार?, शपथविधीच्या चार दिवसांतच…
