-
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) लवकरच ‘लग्नाचा शॉट’ (Lagnacha Shot Movie) या नव्या कोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात पार पडला.
-
या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी प्रियदर्शिनीने हटके लूक केला होता.
-
ट्रेलर लाँचसाठी प्रियदर्शिनीने एका खास फॅशन स्टेटमेंटची निवड केली होती.
-
प्रियदर्शिनीने पांढऱ्या रंगाच्या फॉर्मल शर्टवर काळ्या आणि सोनेरी रंगाचा डिझायनर वन-पीस ड्रेस परिधान केला होता.
-
या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणाले, “या चित्रपटातून आम्ही केवळ मनोरंजन न देता, नात्यांमधील गुंतागुंत, गैरसमज आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रवास अतिशय हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडला आहे.”
-
अक्षय गोरे यांनीच या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
