-
‘काजळमाया’ मालिकेत ‘आभा’ची भूमिका साकारणारी वैष्णवी कल्याणकर सध्या तिच्या कोकणातील सुंदर फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
-
या फोटोशूटसाठी वैष्णवीने निवडलेल्या गडद जांभळ्या रंगाच्या चंदेरी सिल्क साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात वैष्णवीचा हा पारंपारिक मराठमोळा लूक अत्यंत मोहक दिसत आहे.
-
या चंदेरी सिल्क साडीवर तिने परिधान केलेली नाकातील पारंपारिक नथ तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
-
या साडीवर तिने सोडलेले कुरळे केस तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
चंदेरी साडी, कानातले झुमके आणि हातातील घड्याळ असा तिचा हा लूक आधुनिक आणि परंपरेचा सुरेख संगम आहे.
-
निसर्गाच्या सानिध्यात काढलेल्या या फोटोंमध्ये वैष्णवीचे हास्य आणि साडीचा चंदेरी पोत अधिकच उठून दिसत आहे.
-
‘काजळमाया’ या लोकप्रिय मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
