-
‘वचन दिले तू मला’ या मालिकेतील ही जोडी सध्या सोशल मीडियावर आपल्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता इंद्रनील कामत यांचे हे रोमँटिक फोटो सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत चहाचा आस्वाद घेताना दिसत असून त्यांच्यातील मैत्री स्पष्टपणे दिसून येते.
-
अनुष्काने पिवळ्या रंगाचा ड्रेस तर इंद्रनीलने निळ्या रंगाचा स्वेटर परिधान केला असून दोघांचा लूक अतिशय मोहक वाटत आहे.
-
या फोटोंना सोशल मीडियावर शेअर करताना त्यांनी “आम्हाला तर चहा गोड लागतोय! तुम्हाला?” असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
सोशल मीडियावर या जोडीवर कमेंट्सचा वर्षाव होत असून अनेकांनी या दोघांना ‘बेस्ट जोडी’ असे म्हटले आहे.
-
मालिकेतील त्यांच्या पात्रांइतकीच त्यांची पडद्यामागची मैत्रीदेखील प्रेक्षकांना मनापासून भावत असल्याचे चित्र दिसत आहे.
-
विशेषतः अनुष्काने ज्या पद्धतीने इंद्रनीलला चहा पाजला, त्या फोटोने इंटरनेटवर अधिक पसंती मिळवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: इंद्रनील कामत/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
