-
अभिनेत्री सुरुची अडारकरने नुकतेच एका राजसी सिल्क साडीत फोटोशूट केले असून तिचा हा पारंपरिक लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
-
गडद निळ्या रंगाची साडी आणि त्याला असणारा केशरी-लाल रंगाचा काठ सुरुचीच्या सौंदर्याला एक वेगळीच झळाळी देत आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने नेसलेल्या साडीवर अत्यंत नाजूक सोनेरी बुट्टे आणि पदरावर पारंपरिक नक्षीकाम पाहायला मिळत आहे.
-
साडीला साजेसा असा फिकट चंदेरी रंगाचा कोपरापर्यंत बाह्यांचा ब्लाऊज तिने परिधान केला असून, पाठीला असणाऱ्या दोरीच्या नॉटमुळे तिचा लूक अधिक स्टायलिश दिसत आहे.
-
गळ्यातील काळ्या मण्यांचे लांब मंगळसूत्र तिच्या या घरंदाज आणि सात्विक लूकला अधिक उठावदार बनवत आहे.
-
केसांची अर्धवट वेणी घालून त्यावर माळलेल्रा पांढऱ्या शुभ्र फुलांचा गजरा तिच्या या पारंपरिक पेहरावात भर टाकत आहे.
-
अगदी साधा मेकअप आणि कपाळावर लावलेली छोटी टिकली सुरुचीच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडवत आहे.
-
सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल झाले असून, चाहत्यांनी तिच्या या मराठमोळ्या सौंदर्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
