-
‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. दैनंदिन मालिकांमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच कलाकारांचं शेड्युल खूपच व्यग्र असतं. मात्र, या सगळ्यातून वेळ काढत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री जुई गडकरी एका खास ठिकाणी फिरायला गेली होती.
-
जुईने तिच्या परदेशवारीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
जुई हाँगकाँग फिरायला गेली होती.
-
हाँगकाँग डिस्ने लँडचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याठिकाणी प्रचंड थंडी असल्याने जुईने फोटो शेअर करत याला ‘Freezing’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
जुई ट्रिपचे फोटो शेअर करत लिहिते, “प्रवास केल्यावर माझं मन शांत होतं. अनेक महिन्यांनी स्वत:साठी असा वेळ काढला; याची खूप गरज होती. अजून भरपूर प्रवास करणं बाकी आहे. माझ्या ट्रिपच्या पहिल्या दिवसाचे फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. #हाँगकाँग”
-
हाँगकाँग फिरताना जुईने भरपूर शॉपिंग केली आहे. याशिवाय तेथील लोकल फूड देखील तिने ट्राय केलं आहे.
-
एक सेल्फी फोटो शेअर करत अभिनेत्री लिहिते, “माझ्या वजनाएवढी शॉपिंग बॅग भरलीये. जेव्हा तुमचं वजन आणि शॉपिंग बॅगचं वजन सारखंच होतं…” याचा अर्थ हाँगकाँग फिरून अभिनेत्रीने भरपूर शॉपिंग केल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
जुईने याठिकाणी Fireworks शो देखील पाहिला.
-
दरम्यान, जुईने शेअर केलेल्या या सगळ्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी इन्स्टाग्राम )
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
