-
लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडियावर तिच्या रात्रीच्या दिनचर्येचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्वेता बेडवर निवांत बसल्याचे दिसत असून, तिच्या चेहऱ्यावर एक मोहक हास्य पाहायला मिळत आहे.
-
तिने ‘देवी’ नावाचे पुस्तक हातात धरले असून, ती या पोस्टमध्ये वाचनाची आवड जोपासताना दिसत आहे.
-
राखाडी रंगाच्या कॅज्युअल टॉपमध्ये श्वेताचा ‘नो-मेकअप’ लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
-
श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘खाणे, वाचणे आणि झोपण्याचे नाटक करणे’, अशी तिची रात्रीची दिनचर्या आहे.
-
इतकेच नाही, तर झोपण्यापूर्वी ती पुन्हा एकदा ‘धुरंधर’ पाहते, असेही तिने मिश्की,,लपणे नमूद केले आहे.
-
वयाच्या या टप्प्यावरही श्वेताचा फिटनेस आणि ग्लो पाहून तिचे कौतुक केले जात आहे.
-
श्वेताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून तिच्या ‘नाईट रुटीन’ची चर्चा रंगली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्वेता तिवारी/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
