-
बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया ही तिच्या सोशल मीडियावर आरोग्यविषयक सूचना देताना दिसते. अशातच काही दिवसांपूर्वी तिनं ब्लोटिंगवरील एक पेय सांगितलं आहे.
-
नेहा धुपियाने ब्लोटिंग आणि पचनाच्या त्रासावर घरच्या घरी बनवता येणारा सोपा आणि पारंपरिक उपाय सांगितला आहे.
-
नेहा धुपियाने ब्लोटिंग आणि पचनाच्या त्रासावर घरच्या घरी बनवता येणारा सोपा आणि पारंपरिक उपाय सांगितला आहे.
-
तसंच दिवसभराच्या थकव्यानंतर हे पेय तिच्यासाठी हमखास उपयोगी ठरतं, असंही नेहाने सांगितलं. हे पेय तयार करणं खूप सोपं आहे.
-
पाण्यात बडीशेप, ओवा, जिरे, थोडं बारीक चिरलेलं आलं आणि आवडीनुसार थोडंसं लिंबू घालून हे मिश्रण साधारण पाच मिनिटं उकळायचं. नंतर ते कोमट अवस्थेत प्यायचं.
-
“हे अँटी-ब्लोटिंग ड्रिंक माझ्यासाठी जादूसारखं काम करतं. दिसायलाही छान आणि चवीला देखील छान आहे. यामुळे पोट फुगणं कमी होतं, पचन सुधारतं आणि झोपही चांगली लागते”, असंही नेहाने सांगितलं.
-
अँटी-ब्लोटिंग ड्रिंकसाठी नेहाने तिच्या न्यूट्रिशनिस्ट रिचा गंगानीचे आभार मानले. तसेच, हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टर किंवा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घ्यावा, असंही तिने आपल्या चाहत्यांना सांगितलंय.
-
दरम्यान, नेहाबद्दल सांगायचं झाल्यास, ती आपल्या अभिनयासह फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठी ओळखली जाते. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नेहा डाएट आणि व्यायामासह काही घरगुती गोष्टीदेखील करते. अशातच तिनं घरगुती पेय सांगितलं आहे.
Sunetra Pawar Oath : सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर, पुन्हा शपथ घ्यावी लागणार?, शपथविधीच्या चार दिवसांतच…
