-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
नुकताच कार्तिकीच्या घरी लेक रिशांकचा (Rishank Pise) बोरन्हाण (Boranhan) सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
-
बोरन्हाण हा ५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी केला जाणारा एक विशेष कौतुक सोहळा आहे.
-
पौराणिक कथेनुसार, ‘किंकर’ किंवा ‘करी’ नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी लहान मुलांवर पडू नये आणि मुलांचे रक्षण व्हावे, या उद्देशाने बोरन्हाण करण्याची परंपरा आहे.
-
या विधीमध्ये लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवले जाते.
-
पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते आणि त्यानंतर मुलांच्या डोक्यावरून बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे आणि चॉकलेट्स यांची उधळण केली जाते.
-
हे मुलांवरील संकट दूर करण्याचे आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचे एक प्रतीक मानले जाते.
-
लेकाच्या बोरन्हाण सोहळ्यासाठी कार्तिकीने सुंदर सिल्क साडी आणि त्यावर आकर्षक अरी वर्क केलेला ब्लाऊज परिधान केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
