-
मराठी अभिनेत्री रूपाली भोसले हिने नुकतीच आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेली मंदिरातील खास पोस्ट सध्या चर्चेत आहे.
-
या फोटोमध्ये रूपाली उज्जैन येथील श्री कालभैरव मंदिरात दर्शनासाठी गेली आहे.
-
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उभी असलेली रूपाली कपाळावर भस्म आणि टिळा लावून श्रद्धेच्या भावनेत दिसत आहे.
-
रूपालीने परिधान केलेली डार्क ब्राऊन आणि गुलाबी छटांची कांजीवरम साडी, त्यावर सोनसळी काठ, पारंपरिक दागिने आणि मोकळे केस, असा तिचा लूक लक्षवेधी ठरलाय.
-
फोटोंमध्ये मंदिर परिसरातील दिव्यांची रोषणाई आणि भक्तांची गर्दी दिसत असून, रूपालीचा चेहऱ्यावरचा शांत हास्यभाव तिच्या भक्तीची अनुभूती देतो.
-
या फोटोंसोबत रूपालीने कॅप्शनमध्ये ‘शिव ही आरंभ, शिव ही अंत’ असे शब्द लिहिले आहेत. तसेच ‘ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव’ असे भक्तिभावपूर्ण वाक्य तिने शेअर केले आहे.
-
रूपाली भोसले सध्या ‘लपंडाव’ या मराठी मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
-
कामाच्या धावपळीतून वेळ काढत आध्यात्मिक स्थळी भेट देणं आणि त्या क्षणांना चाहत्यांसोबत शेअर करणं, ही रूपालीची खासियत ठरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रूपाली भोसले/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
