-
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख ही जोडी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघांना महाराष्ट्राचे ‘दादा-वहिनी’ म्हणून लोकप्रिय आहेत.
-
रितेश आणि जिनिलीया देशमुख यांनी एकमेकांना १० वर्षे डेट केल्यावर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी थाटामाटात लग्न केलं. अशातच आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
-
रितेश आणि जिनिलीया देशमुख यांच्या संसाराला १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने लग्नातील खास फोटो शेअर केले आहेत.
-
जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करीत खास पोस्टसुद्धा शेअर केली आहे. जिनिलीयाने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
लग्नाच्या फोटोंसह ती म्हणते, “प्रिय रितेश आज, उद्या आणि कायमच… मी तुझ्यावर प्रेम करते. तू नेहमीच माझ्या आयुष्याच्या कथेतला एक सुंदर अध्याय असशील. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
-
जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंखालील कमेंट्समध्ये त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
-
रितेश आणि जिनिलीया ही जोडी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोहल मीडियावर ते त्यांचे अनेक रोमॅंटिक फोटो शेअर करताना दिसतात. तसंच मजेशीर व्हिडीओसुद्धा शेअर करत असतात.
-
मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयानं आणि दिग्दर्शनानं रितेशनं स्वत:चं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे; तर जिनिलीयासुद्धा मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे.
-
रितेश अणि जिनिलीया आगामी ‘राजा शिवाजी’ या सिनेमातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर, रितेश सध्या ‘बिग बॉस मराठी ६’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
