-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) सध्या त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे.
-
अक्षयने काही दिवासांपूर्वीचे पत्नी साधना काकतकरबरोबर (Sadhana Kakatkar) लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली.
-
नवविवाहित जोडप्यासाठी लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत अत्यंत खास असते.
-
या खास प्रसंगासाठी दोघांनीही पारंपारिक पेहरावाला पसंती दिली होती. अक्षयने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता, तर साधनाने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधले.
-
अक्षय आणि साधनाने साखरेच्या पाकापासून तयार केलेले पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने परिधान केले होते.
-
या पारंपरिक दागिन्यांमध्ये दोघांचेही सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
अक्षय आणि साधना ९ मे २०२५ रोजी विवाहबंधनात अडकले. लग्नापूर्वी ते जवळपास १० वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षय केळकर/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
