-
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने फेसबुकवर केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.
-
भाग्यश्री मोटेच्या वडिलांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त तिने खास पोस्ट केली आहे.
-
भाग्यश्रीने तिच्या वडिलांबरोबरचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!
-
गेल्या वर्षात आपलं नातं हे वेगळ्या पद्धतीने घट्ट झालंय. न बोलता एकमेकांस समजून घेणं आणि आपल्या जबाबदाऱ्या भक्कमपणे ठाम राहून पार पाडणं हे वास्तवात किती सुंदर आहे. – भाग्यश्री मोटे
-
तुम्हीच माझ्या आयुष्याचा प्रकाश आहात ज्यांना बघून मला स्फूर्ती मिळते. – भाग्यश्री मोटे
-
तुम्ही निरोगी आणि सुखी राहावे म्हणून मी नेहमीच प्रयत्न करीन. बाकी काय, सगळी संकटं आपण निभावून नेवूच. आणि हो माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे, असं कॅप्शन भाग्यश्री मोटेने फोटोंना दिलं आहे.
-
भाग्यश्री मोटेच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो – भाग्यश्री मोटे इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
