-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेत्री शिवाली परबने सोशल मीडियावर तिचा एक नवा लूक शेअर केला असून, त्यात ती अतिशय मोहक दिसत आहे.
-
शिवालीने या फोटोंमध्ये गडद हिरव्या रंगाचा सुंदर एम्ब्रॉयडरी असलेला पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोला तिने ‘Green’ असे छोटेखानी, पण समर्पक कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनीही त्यावर लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
अभिनेत्रीने तिच्या या लूकला पूर्ण करण्यासाठी कानामध्ये मोठे सिल्व्हर झुमके घातले आहेत, जे तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
शिवालीच्या मोकळ्या केसांत माळलेले एक गुलाबी फूल तिच्या या साध्या आणि नैसर्गिक लूकला अधिकच आकर्षक बनवत आहे.
-
या फोटोंमध्ये शिवालीचा मेकअप अत्यंत नैसर्गिक असून, तिची हलकी स्माईल चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.
-
शिवलीचा पारंपरिक थाट नेहमीच तिच्या चाहत्यांना भुरळ घालतो आणि हा फोटोही त्याला अपवाद नाही.
-
ड्रेसवर असलेल्या सोनेरी नक्षीकामामुळे शिवालीला एक रॉयल लूक मिळाला असून, तिची स्टाईल सध्या चर्चेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवाली परब/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
