-
दरवर्षी आपला वाढदिवस नेमका कसा साजरा करायचा, कुठे फिरायला जायचं, वाढदिवसानिमित्त एखादी खास वस्तू खरेदी करायची असं बरंच काही आपण ठरवलेलं असतं. अशाचप्रकारे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने तिचा वाढदिवस थेट न्यूयॉर्कमध्ये साजरा केला आहे.
-
या अभिनेत्रीचं नाव आहे श्रेया बुगडे. सध्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा अमेरिका दौरा सुरू आहे. यामुळे श्रेया सुद्धा संपूर्ण टीमसह परदेशात आहे.
-
अभिनेत्रीने तिचा यंदाचा वाढदिवस काहीशा हटके पद्धतीने न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरजवळ साजरा केला आहे.
-
श्रेया बुगडेने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
पहिल्याच फोटोमध्ये श्रेया मोठ्या उत्साहात तिचा बर्थडे केक कापताना दिसतेय.
-
यावेळी अभिनेत्रीच्या मित्रमंडळींनी तिच्यासाठी खास चीजकेक आणला होता.
-
प्रचंड थंडी (-१३ अंश सेल्सिअस तापमान ) होती, त्यात जवळच्या मित्रांनी आणलेला चीजकेक हा दिवस माझ्या कायम लक्षात राहील.
-
दरम्यान, श्रेयाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे इन्स्टाग्राम
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
