-
फराह खानच्या अलीकडील व्लॉगमध्ये जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांचा सहभाग असला तरी प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिग्गज पाहुण्यांवर लक्ष केंद्रित होण्याऐवजी अनेक वेळा दिलीपने त्यांच्या गप्पांमध्ये व्यत्यय आणला आणि किस्से मधेच थांबवल्याने टीका झाली आहे.
-
गेल्या दोन वर्षांत दिलीप हा फराहच्या व्लॉगमधील अनपेक्षित स्टार ठरला. हळूहळू त्याला अधिक स्क्रीन टाइम मिळू लागला आणि त्याची लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणात वाढली. सेलिब्रिटींपासून ते छायाचित्रकारांपर्यंत सगळेच फराहला पाहताच दिलीपचेही नाव घेताना दिसत होते.
-
आपल्या विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा व मेहनतीमुळे दिलीपने लाखो लोकांची मने जिंकली. मात्र, यावेळी प्रेक्षकांना वाटले की, त्याने मर्यादा ओलांडल्या आहेत आणि त्यामुळेच त्याबाबत नाराजीही व्यक्त केली जात आहे.
-
काही वर्षांपूर्वी दिलीप हा एका बॉलीवूड सेलिब्रिटीच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. भाजी चिरणे, जेवण बनवणे, हीच त्याची ओळख होती. आज तो इंटरनेटवर प्रसिद्ध असून मुंबईतील उच्चभ्रू वर्तुळात त्याचे कौतुक होत आहे.
-
मात्र, त्याला हे यश नेमके कशामुळे मिळाले? केवळ कष्टामुळे की नशिबाच्या साथीने? एका अहवालानुसार, ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात बिहारमधील एका छोट्या गावातून १६ वर्षांचा दिलीप केवळ २५० रुपयांसह मोठ्या शहराकडे निघाला होता.
-
उत्तर बिहारमधील लाखो तरुण जसा दरवर्षी कामाच्या शोधात महानगरांकडे जातात, तसाच दिलीपचाही प्रवास होता; मात्र त्याची कहाणी वेगळी ठरली. योगायोग, योग्य वेळ आणि काहीतरी करून दाखवण्याची वृत्ती यावर त्याने स्वतःचे आयुष्य उभे केले.
-
एका मुलाखतीत दिलीप म्हणाला, “मेहनत ही बिहारी रक्तातच असते.” या विधानातून त्याचा संघर्ष आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसतो.
-
व्लॉगमध्ये दिलीप फराह खानच्या झपाट्याने बोलणाऱ्या, थोड्या टोमण्याच्या शैलीशी जुळवून घेतो. पाहुण्यांशी तो हसत-खेळत संवाद साधतो. त्याचा अभिनय, तत्काळ प्रतिक्रिया देण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढलेला दिसतो. आज तो मुंबईतील सेलिब्रिटी वर्तुळात मेहनत आणि देशी विनोदासाठी ओळखला जाणारा दुर्मीळ चेहरा ठरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: फराह खान/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
