-
चित्रपटसृष्टीतील काही जोडपी ही लोकप्रिय ठरतात. त्यांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री, एकमेकांप्रतिचा आदर सर्वांची मने जिंकून घेतो. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात.
-
रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसूजा हे अशा लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहे. त्यांना चाहते दादा-वहिनी म्हणून ओळखतात. ते विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावतात.त्यावेळी ते लक्ष वेधून घेतात.
-
रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी एकाच चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
२००३ ला प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. या चित्रपटातील त्यांच्या कामाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. ३ फेब्रुवारी २०१२ ला त्यांनी लग्नगाठ बांधली.
-
आज ३ फेब्रुवारी २०२६ ला त्यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने रितेश देशमुखने त्यांची एक रील शेअर केली आहे. यामध्ये हा व्हीडिओ शेअर करताना रितेशने लिहिले, “लग्नाला १४ वर्षे झाली. हा वनवास कधीच संपू नये.” पुढे त्याने जिनिलीयाच्या अकाउंटला टॅग करत लिहिले, “बायको, हॅपी अॅनिव्हर्सरी.”
-
तर जिनिलीयाने इन्स्टाग्रावर त्यांच्या लग्नातील सुंदर फोटो शेअर केले आहेत. ते फेरे घेत असतानाचा एक फोटो पाहायला मिळत आहे. तर रितेश जिनिलीयाच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असल्याचेदेखील एका फोटो पाहायला मिळत आहे.
-
याबरोबरच, त्यांच्या लग्नातील हळदीच्या कार्यक्रमातील काही फोटो पाहायला मिळत आहेत. मेहंदी, बांगड्या असे विविध फोटोदेखील पाहायला मिळत आहेत. या फोटोंमधून त्याच्या खास क्षणांची झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहेत.
-
हे फोटो शेअर करताना जिनिलीयाने लिहिले, “आय लव्ह यू पार्टनर. आज, उद्या आणि कायमच माझे तुझ्यावर प्रेम असेल. आयुष्याच्या या सुंदर गोष्टीतील तू माझा कायमच आवडता धडा आहेस.” पुढे तिने रितेशच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
दरम्यान, रितेश आणि जिनिलीयाने वेड या चित्रपटातही एकत्र काम केले आहे. रितेश अभिनयाबरोबरच दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील काम करत आहे. सध्या रितेश बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहे. त्याच्या सूत्रसंचालनाचे कौतुक होताना दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य: जिनिलीया देशमुख इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
