-
‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातून नुकतीच एक स्पर्धक बाहेर पडली ती म्हणजे, सोनाली राऊत. गेल्या आठवड्यात राधा पाटीलनं निरोप घेतला. त्यानंतर सोनाली राऊतची एक्झिट झाली.
-
‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर येताच सोनालीने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. प्रकृतीच्या कारणास्तव ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर आल्याचं कारण तिने सांगितलं.
-
लोकसत्ताशी साधलेल्या संवादात सोनाली म्हणाली, “घरात गेल्या नंतर तिसऱ्या दिवशीच मला इन्फेक्शन झालं. त्या घरात जाताच मला स्कीन इन्फेक्शन झालं.”
-
यापुढे ती म्हणाली, “१७ जण एकत्र या घरात आले आहेत. त्यामुळे हायजीनचा प्रश्न आहे. त्यात मला ओ.सी.डी.सुद्धा आहे. १७ जणांसाठी एकच स्वच्छतागृह आहे.”
-
यानंतर सोनाली म्हणाली, “इन्फेक्शन झाल्याचं मला तीन दिवस आधी कळलं. डॉक्टरांनी मला बरं व्हायला दोन आठवडे लागतील असं सांगितलं. हे इन्फेक्शन होण्याचं कारण आहे हायजीन.”
-
पुढे सोनाली म्हणाली, “घरातल्यांनी हायजीन न पाळल्याने मला इन्फेक्शन झालं. मला स्केबीज (Scabies) आजार झाला आणि यामुळे मला बिग बॉसच्या घराबाहेर यावं लागलं.”
-
नंतर ती म्हणाली, “सगळे एकमेकांचे टॉवेल्स वापरतात. स्वच्छतागृह स्वच्छ ठेवली जात नाहीत. खाण्याचे पदार्थ स्वच्छतागृहात पडलेले असायचे. या सगळ्यामुळे मला हायजीनचा त्रास झाला.”
-
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या गेल्या आठवड्यात दिपाली सय्यद, सोनाली राऊत, विशाल कोटियन, प्रभू शेळके, करण सोनवणे, प्राजक्ता शुक्रे, रूचिता जामदार आणि ओमकार राऊत हे स्पर्धक बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते.
-
या नॉमिनेटेड सदस्यांपैकी सोनाली राऊतचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. घराबाहेर पडताना तिला घरातील सर्वच स्पर्धकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं. (फोटो : इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
