-
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात हजेरी लावत भगवान शंकराचे दर्शन घेतले.
-
या खास प्रसंगी अनन्याने निळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता, तिचा हा साधा आणि नैसर्गिक लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
-
मंदिराच्या गाभाऱ्यात बसून तिने मनोभावे प्रार्थना केली असून तिच्या कपाळावरील चंदनाचा टिळा तिच्या सात्त्विक रूपाला अधिकच शोभा देत होता.
-
अनन्याने शिवलिंगासमोर हात जोडून आशीर्वाद घेतले, तिचे हे भक्तीमय फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आहेत.
-
दर्शनानंतर तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करत ‘हर हर महादेव’ अशी कॅप्शन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
हे तिचे पहिलेच ज्योतिर्लिंग दर्शन असून, हा अनुभव तिच्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय असल्याचे तिने आवर्जून सांगितले.
-
आपल्या पोस्टमध्ये तिने या आध्यात्मिक भेटीला “एका सर्वोत्तम प्रवासाची सुरुवात” असे म्हटले असून ती खूप आनंदी दिसत आहे.
-
ग्लॅमरस विश्वात वावरणाऱ्या अनन्याचे हे भक्तीत तल्लीन झालेले रूप पाहून तिचे चाहते तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनन्या पांडे/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
