-
मराठी अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर सध्या बालीमध्ये आपल्या सुट्यांचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत.
-
श्रुतीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बालीच्या सुंदर आणि हिरव्यागार निसर्गामध्ये हरवून गेल्याचे पाहायला मिळतेय.
-
एका फोटोमध्ये श्रुती फुलांनी सजवलेल्या ‘जंगल स्विंग’वर बसून, तिथल्या निसर्गरम्य दऱ्यांचा आनंद घेताना अतिशय सुंदर दिसत आहे.
-
गौरव आणि श्रुती या दोघांनी समुद्रकिनाऱ्यावर एकत्र वेळ घालवला असून, त्यांचे कूल फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
या सहलीत श्रुतीने तिथल्या प्रसिद्ध जागांना भेटी दिल्या असून, पांढऱ्या रंगाच्या ‘पोल्का डॉट’ ड्रेसमधील तिचा लूक खूपच मोहक आहे.
-
केवळ फिरणेच नाही, तर श्रुतीने बालीमध्ये ‘फ्लायबोर्डिंग’सारख्या साहसी जलक्रीडांचा अनुभव घेत आपले धाडसी रूपही दाखवले आहे.
-
श्रुतीने तिथल्या स्थानिक कॉफीचा आनंद घेतला आणि त्या प्रक्रियेची माहितीही जाणून घेतली.
-
प्रत्येक फोटोमध्ये श्रुतीचा आनंद ओसंडून वाहत असून, तिचा हा ‘बाली फोटो डम्प’ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
