-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte TV Serial) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे (Apurva Gore) सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.
-
अपूर्वाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
-
अपूर्वाने हे फोटो शेअर करताना ‘चाफा आणि तो…. मला खूप आवडतात… #ठरलं’ असे रोमँटिक कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोंमध्ये अपूर्वाने सुंदर हिरवी साडी नेसली असून तिच्या होणाऱ्या जोडीदाराने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
-
सोशल मीडियावरील चर्चेनुसार, अपूर्वाचा होणारा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध अभिनेता अंशुमन जोशी (Anshuman Joshi) आहे.
-
अंशुमनने सुजय डहाके दिग्दर्शित ‘शाळा’ या गाजलेल्या चित्रपटात ‘मुकुंद जोशी’ ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
‘शाळा’मध्ये त्याने साकारलेलं अल्लड वयातलं प्रेम आजही त्याच्या अभिनय क्षमतेची आठवण करून देतो.
-
अंशुमन हा केवळ अभिनेताच नाही, तर तो उत्तम दिग्दर्शक, लेखक, चित्रलेखक आणि छायाचित्रकारदेखील आहे.
-
अंशुमनने काम केलेल्या ‘शाळा’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर त्याच्या दमदार अभिनयासाठी त्याचा ही गौरव करण्यात आला होता.
-
‘शाळा’नंतर तो ‘फोटोकॉपी’ या चित्रपटात आणि काही महत्त्वपूर्ण मराठी नाटकांमध्ये झळकला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
