-
टीव्ही विश्वातली लोकप्रिय जोडी अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
येत्या ६ फेब्रुवारी रोजी दोघे लग्नबंधनात अडकणार असून दोघांच्या घरी लग्नाची लगबग सुरू आहे. याचे खास क्षण पाहायला मिळाले.
-
साक्षी महाजनच्या घरी नुकताच घाणा आणि बांगड्या भरण्याचा सोहळा पार पडला. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
अशातच आता साक्षीच्या हातावर होणारा नवरा म्हणजेच अथर्वच्या नावाची मेहंदी रंगली आहे. नुकताच अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा पार पडला.
-
मेहंदी सोहळ्यातील खास फोटो साक्षीने शेअर केले आहेत. या मेहंदी सोहळ्यासाठी साक्षीने मोरपिशी रंगाचा सुंदर ड्रेस, सुंदर दागिने असा लूक केला होता.
-
सोशल मीडियावरील या फोटोंमधून साक्षीच्या हातावर सुंदर अशी मेहंदी रेखाटल्याचंदेखील पाहायला मिळत आहे. या फोटोंवर गिरिजा प्रभू, ऐश्वर्या शेट्येसह अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.
-
गेल्याच वर्षी एका मुलाखतीत साक्षीनं २०२६ मध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी साक्षीनं अथर्व कर्वेबरोबर लग्नगाठ बांधणार असल्याचं जाहीर केलं.
-
साक्षी आणि अथर्व या दोघांनी त्यांच्या नावावरून लग्नासाठी #साATh असा युनिक हॅशटॅगदेखील करून घेतला आहे. दोघांचे चाहते या लग्नासाठी उत्सुक आहेत.
-
दरम्यान, साक्षी महाजन ही स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम/Harsh_Ahuja_Photography)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
