-
झी मराठीवरील ‘कमळी’ (Kamali TV Serial) या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री विजया बाबर (Vijaya Babar) सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
-
विजयाने नुकतेच काश्मीरमधील सौंदर्याचा राजा मानल्या जाणाऱ्या सोनमर्ग (Sonmarg Kashmir) येथील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
विजयाने गेल्या वर्षी सोनमर्गच्या बर्फाळ दऱ्यांमध्ये सुंदर फोटोशूट केले होते.
-
निसर्गाच्या सानिध्यात विजयाचे हे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
काश्मीरमधील सोनमर्ग हे त्याच्या नावाप्रमाणेच ‘सोन्याचे मैदान’ म्हणून ओळखले जाते.
-
समुद्रसपाटीपासून सुमारे २७३० मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी स्वर्गापेक्षा कमी नाही.
-
येथे वर्षभर बर्फाची चादर पाहायला मिळते. पर्यटक पायी किंवा घोड्यावर स्वार होऊन येथील निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
