-
मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सध्या खूपच चर्चेत आहेत.
-
या फोटोमध्ये अनुष्का गुलाबी रंगाच्या सुंदर ट्यूल ड्रेसमध्ये दिसत आहे. स्ट्रॅपलेस आणि लेयर डिझाईन असलेला हा ड्रेस तिला अगदी ‘पिंक ड्रीम’सारखा लूक देतो.
-
हलका आयशॅडो, गुलाबी लिप्स व साधा बेस मेकअप तिच्या लूकला अधिक मोहक बनवतो.
-
दागिन्यांमध्ये तिने एक नाजूक नेकलेस परिधान केला असून, तो तिच्या एकूण लूकला एलिगंट टच देतो.
-
मोकळे केस आणि हलकी साईड पार्टिंग हा लूक पूर्ण करताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरचे हसू आणि सहज दिलेल्या पोजेस फोटोला आणखी खास बनवतात.
-
हे फोटो शेअर करताना अनुष्काने ‘Feeling like a little pink dream today’ अशी कॅप्शन दिली आहे, जी तिच्या लूकला अगदी अनुरूप अशी आहे.
-
सोशल मीडियावर चाहत्यांकडून या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेकांनी तिच्या सौंदर्य आणि स्टाईलचे कौतुक केले आहे.
-
अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, अनुष्का पिंपुटकरने ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मराठी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनुष्का पिंपुटकर/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
