-
ऊर्मिला मातोंडकर बॉलीवूडमधील ९०च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांनी विविध चित्रपटांमधून लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. हिंदी, तेलुगू, तमीळ, मराठी व मल्याळम अशा भाषेतील चित्रपटांत तिने काम केलं आहे.
-
ऊर्मिला यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही तुम्हाला ओटीटीवर उपलब्ध असणाऱ्या तिच्या काही चित्रपटांची नावं सांगणार आहोत. ‘मासूम’ ते ‘जुदाई’ या चित्रपटांचा या यादीत समावेश आहे.
-
कौन- हा ऊर्मिला मातोंडकरच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिने सायकोपाथ किलरची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.
-
जुदाई – ऊर्मिला मातोंडकरच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी हा एक आहे. त्यामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी, अनिल कपूर व ऊर्मिला मातोंडकर हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये झळकलेले. हा चित्रपट तुम्ही झी ५, अमॅझॉन प्राइम व्हिडीओ आणि यूट्यूबवर पाहू शकता.
-
हिंदुस्तानी – हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. त्यामध्ये ऊर्मिलाने सपना या श्रीमंत मुलीची भूमिका साकारली आहे, जी चंद्रू नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते. हे पात्र दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनी साकारलं आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स, अमॅझॉन प्राइम व्हिडीओ आणि यूट्यूबवर पाहू शकता.
-
मासूम – १९८० मध्ये आलेल्या या चित्रपटात अभिनेते नवाजुद्दिन सिद्दिकी मुख्य भूमिकेत आहेत. ऊर्मिलानं त्यामध्ये बालकलाकार म्हणून काम करताना त्यांच्या मुलीची भूमिका साकारलेली.यातील गाणी आजरामर आहेत. हा चित्रपट तुम्ही अमॅझॉन प्राइम व्हिडीओ आणि यूट्यूबवर पाहू शकता.
-
भूत – हा एक हॉरर चित्रपट आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ऊर्मिलानं स्वाती नावाची भूमिका साकाली आहे. तिला तिच्या राहत्या घरात विचित्र अनुभव येत असतात. हा चित्रपट जिओ हॉटस्टार, अमॅझॉन प्राइम व्हिडीओ आणि यूट्यूबवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
-
रंगीला – हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. त्यामध्ये तिनं मिली हे पात्र साकारलं आहे. आमिर खान यामध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट तुम्ही अमॅझॉन प्राइम व्हिडीओ, जिओ हॉटस्टार आणि यूट्यूबवर पाहू शकता.
-
सत्य – या चित्रपटात ऊर्मिला मातोंडकरनं विद्या हे पात्र साकारलेलं. हा चित्रपट तुम्ही अमॅझॉन प्राइम व्हिडीओ, सोनी लीव्ह आणि यूट्यूबवर पाहू शकता. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
