-
लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांचे ‘लग्नपंचमी’ (Lagna Panchami Marathi Natak) हे नवंकोरं नाटक वर्षाच्या सुरुवातीलाच रंगभूमीवर दाखल झाले आहे.
-
या नाटकात मराठी चित्रपटसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.
-
चित्रपट, मालिका, वेब सीरिज आणि रिॲलिटी शो अशा सर्व माध्यमांत आपली मोहोर उमटवल्यानंतर अमृता आता पहिल्यांदाच व्यावसायिक नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर पदार्पण करत आहे.
-
सध्या अमृता या नाटकाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून, नुकतेच तिने डेनिम ड्रेसमधील (Denim Dress Look) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
कारमध्ये बसून दिलेल्या अमृताच्या या खास पोज सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
आपल्या अनुभवाबद्दल बोलताना अमृता म्हणाली, “नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा एक वेगळा अनुभव असतो. रंगभूमीवरील तो जिवंत थरार अनुभवताना मला खूप मजा येत आहे.”
-
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि निर्माती-लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, “या नाटकात प्रेक्षकांचे डोळे ओलावणारे मोजकेच प्रसंग आहेत; मात्र, त्या व्यतिरिक्त संपूर्ण नाटक प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे आणि विनोदी धाटणीचे आहे.”
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
